आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थांचा पुढाकार:अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी काैशल्य विकास कार्यशाळा

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगकांना कुशल मनुष्यबळाची तीव्र वानवा असून त्याची निर्मिती होण्यासाठी आता सर्वच अभियांत्रिकी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याच धर्तीवर संदीप पाॅलीटेक्निक महाविद्यालयातील विद्युत व स्थापत्य विभागाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख काैशल्य आत्मसात करता यावी, यासाठी काैशल्य विकास कार्यशाळा आयोजित केली आहे. आठवडाभर ही कार्यशाळा सुरु राहाणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना भविष्यात उत्तम रोजगार मिळेल, असे स्पष्ट मत प्राचार्य पंकज धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. टी. जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...