आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम संस्थांच्या अडचणी सोडविणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला आश्वासन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (व्हीटीपी) संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन कौशल्य विकास व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला दिले. संस्थांचा अभ्यासक्रम अंतिम करण्यासाठी राज्य समितीची स्थापना करण्यात येईल व महाराष्ट्र चेंबर या समितीचा स्थायी सदस्य असेल, तसेच व्हीटीपी संस्थांच्या समस्या सोडविण्याकरिता कौशल्य विकास विभागासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून व्हीटीपी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येईल, असेही टोपे यांनी स्प‌ष्ट केले. महाराष्ट्र चेंबरचे शिष्टमंडळ, अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली, कौशल्य विकास व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटले. व्हिटीपी संस्थांच्या अडचणी त्यांनी मांडल्या. महाराष्ट्र चेंबरतर्फे झालेल्या कौशल्य विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष ललित गांधी यांनी आरोग्य व कौशल्य विकासमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सादर केला. गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कौशल्य विकास समिती व महिला समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कौशल्य विकासाकरिता वेगवेगळे कार्यक्रम, कार्यशाळा राबवण्यात येत असल्याचे गांधी यांनी सांगितले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, महिला समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, स्वप्नील शाह, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...