आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचवटी व जुने नाशिक गावठाण तसेच शहरातील लहान माेठ्या १८३ झाेपडपट्ट्यांमधील अरूंद रस्त्यावर असलेल्या घरातील कचरा संकलनासाठी पालिकेने ८३ लहान घंटागाड्या नवीन ठेक्याद्वारे दिल्या असल्या तरी, या गाड्या शहरातील १२ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्त्यांवर फिरत असल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेले नियाेजन वादात सापडले आहे. विशेष म्हणजे, यातील लहान वाहनात कर्मचारी बसेल किंवा उभा राहील अशी व्यवस्था नसल्यामुळे कमी उंचीच्या महिलांच्या अक्षरश: कचरा अंगावर पडत आहे.
दरम्यान, यासंदर्भात साेमवारी उद्धव ठाकरे शविसेना तसेच भाजप व माकपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजपासून आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुुलकुंडवार यांनी स्वत: पायी फिरून घंटागाड्यांच्या तक्रारीची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन घंटागाडी योजनेतील ८३ लहान घंटागाड्याांबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीं वाढल्यानंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या गाड्यांची उंची मोजण्यासह या गाड्यांवर तातडीने कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. घंटागाडी योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, आयुक्त डॉ. पुलकुंडवार मंगळवारी (दि. ६) घंटागाड्यांची पाहणी करणार आहेत. दरम्यान, या घंटागाड्यांबाबत शविसेना (ठाकरे गट) माजी गटनेता विलास शिंदे, व माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी आयुक्तांकडे तक्रार करत, ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.
नवीन घंटागाड्या सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ घेतल्यानंतरही अडचणी येत असल्याने संशय वाढला आहे. अशातच, सातपूर व पंचवटीतल्या ठेकेदारासोबतच नाशिकरोड, नाशिक पश्चिम, पूर्व आणि सिडकोतही घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. टागाड्यांची संख्या वाढून तक्रारी वाढत असल्याममुळे आयुक्त डॉ. पुलकुंडवार मंगळवारी स्वत: काही विभागांना भेटी देऊन अचानक घंटागाड्याची पाहणी करणार आहेत.
भाजपाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेत नविेदन दिले. पाठाेपाठ उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेता विलास शिंदे यांनी घंटागाड्यांची उंची तपासण्याची व घंटागाड्यांवर कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माकपाचे माजी नगरसेेवक तानाजी जायभावे यांनी याबाबत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.