आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्देशालाच हरताळ:लहान घंटागाड्या गल्लीबाेळांऐवजी माेठ्या रस्त्यांवरच ; क्षमता व उंची ठरतेय डाेकेदुखी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७५ काेटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका ३५४ काेटींवर गेल्यानंतर शहरात शंभर टक्के कचरा संकलन हाेऊन स्वच्छ व सुंदर नाशिक हाेईल ही अपेक्षा दुसऱ्याच दिवशी फाेल ठरली आहे. जवळपास सव्वाशे नवीन वाहनांची संख्या वाढवली असली आहे. विशेष म्हणजे गल्लीबाेळातील कचरा संकलनासाठी माेठ्या गाड्या जाऊ शकत नसल्यामुळे लहान गाड्या आणण्याची याेजना अंमलात आणली. प्रत्यक्षात या गाड्या १२ मीटर रुंद रस्त्यावरही फिरत असल्यामुळे हा खटाटाेप कशासाठी असा संतप्त सवाल केला जात आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जुन्या घंटागाड्याची मुदत संपली असल्यामुळे नवीन निविदेसाठी झटपट प्रक्रिया अपेक्षित हाेती मात्र नवीन निविदेची प्रक्रिया हाेऊन केवळ अभ्यासाच्या नावाखाली तब्बल तीन आयुक्तांनी एक वर्षांचा वेळ घेतला. बऱ्याच भवती न भवतीनंतर १ डिसेंबरपासून शहरात ३९६ घंटागाड्या सुरू झाल्या. यापूर्वीच्या ठेक्यात २७४ इतक्याच गाड्या हाेत्या. आता, ८३ नवीन लहान गाड्यांची संख्या वाढवून गल्लीबाेळातील कचरा संकलनाचे नियाेजन हाेते. नवीन घंटागाडी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यांकडूनच काेडकाैतुक झाले. दुसऱ्या दिवशी आता अडचणी समाेर येत आहे. प्रामुख्याने लहान घंटागाड्या या माेठ्या रस्त्यांवर येत असून या गाड्यांची कचरा साठवण्याची क्षमता व उंची डाेकेदुखी ठरली आहे. या गाड्या कमी वेळात भरल्या जात असून त्या रिकाम्या करून पुन्हा येणे अपेक्षित असताना ते हाेत नाही. दरम्यान, याबाबत आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे माजी नगरसेविका प्रियांका माने तसेच विमल पाटील, नरेश पाटील यांनीही तक्रार केली. दंडही नाही व घंटागाड्या किती धावल्या याची माहितीही नाही पहिल्या व दुसऱ्या दिवशी ३९६ घंटागाड्यापैकी प्रत्येक विभागात किती घंटागाड्या गेल्या, त्यांनी किती फेऱ्या व किती कचरा संकलन केले याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नाही. गेल्यावेळी पहिल्या दिवसापासून ठेक्यातील अटीशर्तीत नमूद असलेल्या संख्येप्रमाणे घंटागाड्या नसल्यास दंडात्मक कारवाई हाेत हाेती.

यंदा मात्र, तसे न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. दरम्यान, ठेकेदारांना नियाेजनासाठी संधी देण्याकरिता एक महिना दंडात्मक कारवाई न करता सर्व ऑपरेशन सुरळीत केले जाईल व त्यानंतर बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कठाेर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ आवेष पलाेड यांनी दिला. कर्मचारी पहाटेपासून रस्त्यावर : आता सहापासून घंटागाड्या सुरू करण्याचे आदेश असून नागरिकांची नेमकी अडचण समजून घेण्यासाठी पलाेड यांच्यासह स्वच्छता निरीक्षक तसेच कर्मचारी फिरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...