आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये हिंदुत्त्ववादी संघटनाकडून स्मार्ट सिटीचा निषेध:नीलकंठेश्वर मंदिर परिसरातल्या पायऱ्यांना वाहिली श्रद्धांजली

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर सुशाेेभिकरणाच्या नावाखाली स्मार्टसिटीकडून शहराचा सत्यानाश केला जात आहे. गाेदाकाठाचे प्राचीन काळापासून धार्मिक महत्व आहे. याच पार्श्वभुमीवर गाेदाप्रेमीसह समस्त हिंदूत्ववादी संघटनांकडून शनिवारी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्यांना पुष्पहार अर्पण करत स्मार्टसिटीचा निषेध करण्यात आला.

दरम्यान आठ दिवसांच्या आत बैठक घेवून याबाबत याबाबत ठाेस निर्णय घेणार असल्याचे यावेळी स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी काॅर्पारेशनच्या वतीने शहरात विविध कामासाठी संपूर्ण शहर खाेदले आहे. दुसरीकडे तब्बल 64 काेटी रुपये खर्चून गाेदा ब्युटीफीकेशन प्राेजेक्ट अंतर्गत गाेदाकाठ परिसरात सुशाेभिकरणाचे कामे केली जात आहे.

हे काम करत असतांना मात्र स्मार्टसिटीकडून सांडव्यावरच्या देवी मंदिर परिसरातील सांडव्यासह पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्या देखील ताेडल्या. शेकडाे वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पुरातन गाेष्टी स्मार्टसिटीकडून नष्ट केल्या जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी नाशिककर, गाेदाप्रेमी व हिंदूत्ववादी संघटनांकडून नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील ताेडलेल्या पायऱ्याचाच ठिकाणी आंदाेलन पुकारण्यात आलेले हाेते.

आंदाेलनाच्या प्रारंभी देवांग जानी,कल्पना पांडे, प्रफुल्ल संचेती आदींनी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या गलथान कारभार सर्वासमाेर वाचत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारला.दरम्यान स्मार्ट सिटीचे अधिकारी हिरे यांनी स्मार्ट सिटीलवकरच पूर्वीप्रमाणे पुरातन पायऱ्या बांधून देणार असल्याचे स्मार्टसिटीचे पत्र वाचून दाखविले.

तसेच आठ दिवसाच्या याबाबत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केेले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी स्मार्टसिटी मुर्दाबाद, स्मार्टसिटीचे कामे बंद करा अशा घाेषणा दिल्या. यानंतर स्मार्ट सिटीने ताेडलेल्या पायऱ्यांवर पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या आंदाेलनाच्या माध्यमातून स्माार्टसिटीविराेधात एल्गार पुकारण्यात आला आहे.

यावेळी मामा राजवाडे, रामसिंग बावरी, गिरीष नवसे, रघुनंदन मुठे, सुहास भगने, नरेंद्र धारणे, सागर देशमुख, कैलाश देशमुख, गणेश कमरे,श्रीधर व्यवहारे, चिराग गुप्ता, धनंजय पुजारी, अंबादास खैरे आदीसह नाशिककर उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...