आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरातन नीलकंठेश्वर मंदिर:संरक्षित गाेदाघाटावर पुन्हा फरशा बसविण्याचा ‘स्मार्ट’ उद्याेग ; पूर्वपरवानगी शिवाय काम

नाशिक / सचिन जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदाकाठावरील पुरातन नीलकंठेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केले आहे. यामुळे या मंदिराच्या ३०० मीटर परिसरात काेणतेही काम करण्यापूर्वी पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र, पुरातत्व विभागाच्या या पत्राला केराची टाेपली दाखवत स्मार्ट सिटीने या परिसरात पुन्हा फरशा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकाराद्वारे स्मार्ट सिटीच्या वतीने थेट पुरातत्व विभागालाच एकप्रकारे आव्हान दिले जात असल्याचे समाेर आले आहे. याबाबतचा हा स्पाॅट रिपाेर्ट...

स्मार्ट सिटीच्या वतीने गाेदावरी व परिसरात सुशाेभीकरणाचे काम प्राेजेक्ट गाेदा अंतर्गत केले जात आहे. याच प्राेजेक्ट अंतर्गत रामवाडी ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतच्या परिसरात फरशा बसविण्यात येणार आहे. या कामासाठी काही महिन्यापूर्वी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पुरातन पायऱ्या जेसीबीने ताेडल्या हाेत्या. सुशाेभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटीकडून गाेदाघाट परिसरात पुरातन ठेवा नष्ट हाेत असल्याने याला प्रकाराला सामाजिक संस्थासह, इतिहासप्रेमींनी विराेध केला हाेता. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या वतीने नीलकंठेश्वर मंदिर हे संरक्षित केल्याने या परिसराच्या ३०० मीटर परिसरात काम करताना पुरातत्त्व विभागाची परवानगी घेेणे आवश्यक असते. मात्र परवानगी न घेता स्मार्ट सिटीच्या वतीने या ठिकाणी फरशा बसविण्याचे काम सुरू आहे.

विभागीय आयुक्तांना याबाबत पत्र देणार पुरातत्व विभागाच्या सूचनांचे स्मार्ट सिटीकडून पालन हाेत नसेल तर याबाबत विभागीय आयुक्तांनाच पत्र देणार आहे.संरक्षित नीलकंठेश्वर मंदिराच्या परिसरात काम करण्यास परवागनी दिलेली नाही.- आरती आळे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग

गाेदाकाठचा पुरातन इतिहास जाताेय स्मार्ट सिटीच्या वतीने सुशाेभीकरणाच्या नावाखाली पुरातन वास्तू ताेडल्या जात आहे. याबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच खाेटी उत्तरे दिली जातात. - देवांग जानी, अध्यक्ष, गाेदाप्रेमी सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...