आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट खड्डे कविसंमेलन:गाव शहरातला आपला दाखवा... एक रस्ता मला चांगला दाखवा...!

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाव शहरातला आपला दाखवा एक रस्ता मला चांगला दाखवा... असे म्हणणारे नितीन गाढवे पुढे म्हणतात की, वोट मागायला ते निघाले आता एक नेता तिथे लाजला दाखवा... ही गझल असाे की, रस्त्यावर खड्डे झाले जागाेजागी कंबर अभागी माेडलेगा... हा प्रशांत केंदळेंचा अभंग असाे... नाशकातील खड्ड्यांवर कवींनी भूमिका घेत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. कधी यातून राेष उमटला तर कधी उपहास, कधी विनाेद तर कधी टीकाटिप्पणी... काॅ. राजू देसले यांच्या संकल्पनेतून भाकपने आयटक कार्यालयात रविवारी (दि. २१) दुपारी ज्येष्ठ कवी, लेखक प्रा. डाॅ. शंकर बाेऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कवींनी स्मार्ट खड्डे कविसंमेलनात कवितांनी खड्डे भरले. यात कवी रविकांत शार्दूल म्हणतात की, खड्डे झाले स्मार्ट गड्यांनाे, सेल्फी काढू चला मनपाची उललली पालखी, आरती करू चला... त्यावर रवींद्र मालुंजकर टिप्पणी करतात की, खड्डे झाले आहेत आपल्या कवितेचा विषय खड्ड्यात जाताे की काय, माझ्या कवितेचा आशय.. जयश्री वाघ या भाष्य करतात की, या वाटेवर, या वळणावर सरळ चालले किती तरी काय करू जर पाय घसरला अन‌् पाय मुरगळला तर... कवी प्रशांत कापसेही वास्तव मांडतात... आयुष्यभर खातच आलाे खस्ता ५० वर्षे झाली तरी तसाच आमचा रस्ता... कवी सुरेश भडके अर्थकारणावर लक्ष वेधतात अहाे खड्ड्यांचे काय घेऊन बसला एकेक खड्डा चांगले ४५ हजार खाऊन बसला... आणि संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. बाेऱ्हाडे म्हणाले की, सर आली धावून, रस्ता गेला वाहून डांबर झाले गाेळा, खड्डे पडले साेळा... अशा कवितांनी शहरातील खड्डे अधाेरेखित झाले. या संमेलनात कवी दिलीप पवार, पुष्पलता गांगुर्डे, राज शेळके, कविता बिरारी, देवांग जानी, सचिन आहिरे, दिगंबर काकड, विलास पंचभाई यांच्यासह कवींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन काॅ. महादेव खुडे यांनी केले. आंदाेलनाला साहित्यिकांच्या लेखणीतूनही धार येते. खड्डे सगळ्यांनाच आवडतात. नगरसेवक, अधिकाऱ्यांना जरा अधिकच. म्हणूनच आम्ही शहरातील खड्ड्यांसंदर्भात निवेदने देऊन थकल्याने आता साहित्यिकांनी भूमिका घ्यावी या उद्देशाने हेे कविसंमेलन आयाेजित केले. त्याला प्रतिसाद मिळाला. तब्बल ३० निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या, असे काॅ. राजू देसले म्हणाले.

भूमिका घेण्याची गरज कवी समाजाचा भाष्यकार असताे. म्हणून समाजातील खड्डे या घटनेवर त्याने भाष्य करणं अत्यंत आैचित्याचे आहे. सामाजिक, राजकीय चळवळीतून त्याकडे लक्ष वेधले जाते. मात्र साहित्यिकांनी कवींनी भूमिका घेण्याच्या दृष्टीने अशी कविसंमेलने व्यवस्थेला जागे करू शकतात. - प्रा. डाॅ. शंकर बाेऱ्हाडे, अध्यक्ष, स्मार्ट खड्डे कविसंमेलन

बातम्या आणखी आहेत...