आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंड पुलावरही ‘स्मार्ट’ हातोडा:स्मार्ट काम? स्मार्ट सिटीचे अधिकारी नागरिकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी रामसेतू पाडण्यावरून वाद, त्यानंतर नीळकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्यांवर आलेली संक्रांत आणि आता थेट रामकुंडावरील पुलावरच हातोडा मारण्याच्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांबाबत नागरिकांत प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे.

रामकुंड परिसरात असलेला पूल पाडून त्याऐवजी याच पुलाच्या थोड्या अंतरावर नवीन पूल बांधण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आहे. मात्र, यामुळे रामकुंडावर विधीसाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने हा पूल पाडण्यास पुरोहित संघाने विरोध दर्शविला आहे. तर गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने पूल पाडणे योग्य असल्याचे सांगत काहीजण समर्थनही देत आहेत. या प्रकारामुळे मात्र आता स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत गोदाकाठ परिसरात ६५ कोटी रुपये खर्चून प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबविला जात आहेे. मात्र, गोदावरी नदी व परिसरात केल्या जाणाऱ्या विविध कामांमुळे पुरातत्वच नष्ट होत असून धार्मिक वास्तूंना धोका निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्या तोडण्यावरून नागरिकांनी कामदेखील बंद पाडले होते. यानंतर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १६) प्रोजेक्ट गोदाच्या अंतर्गत प्रत्यक्ष केल्या जाणाऱ्या कामाबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांसह दौराच करण्यात आला.

स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी, कल्पना पांडे, धनंजय पुजारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी रामकुंड परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता रामकुंड परिसरातील पूल पाडून थोड्याच अंतरावर नवा आकर्षक पूल बांधण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, देशभरातून विधी करण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. रामकुंडात अस्थी विसर्जनासाठी अनवाणी पायानेच जात असतात. मात्र, आहे तो पूल न पाडता सद्यस्थितीला असलेल्या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आली. मात्र, हा पूल पाडणे योग्य असून रामकुंड परिसर मोकळा होईल असे सांगत काही नागरिकांकडून यास समर्थन करण्यात आले आहे.

कमिटीसमोर अहवाल सादर करणार
गोदावरी नदी परिसरात केली जाणारी कामे व त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, नागरिकांचा विरोध याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीसमोर अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच ही कमिटी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कामे केली जातील. तोपर्यंत हवं तर काम थांबवू. - सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन

स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी, कल्पना पांडे, धनंजय पुजारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी रामकुंड परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता रामकुंड परिसरातील पूल पाडून थोड्याच अंतरावर नवा आकर्षक पूल बांधण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, देशभरातून विधी करण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. रामकुंडात अस्थी विसर्जनासाठी अनवाणी पायानेच जात असतात. मात्र, आहे तो पूल न पाडता सद्यस्थितीला असलेल्या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आली. मात्र, हा पूल पाडणे योग्य असून रामकुंड परिसर मोकळा होईल असे सांगत काही नागरिकांकडून यास समर्थन करण्यात आले आहे.

गोदाकाठी खोदकाम नको : देशभरातून भाविक रामकुंड, गोदाकाठ परिसरात येत असतात. मात्र, स्मार्ट सिटीच्या कामामुळे गोदावरीचे पुरातत्वच नष्ट होत आहे. यामुळे गोदावरी नदी, रामकुंड परिसरात कोणतेही खोदकाम करून पुरातत्व नष्ट करू नका, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

पुलाची दुरुस्ती करावी
रामकुंड परिसरातील पूल पाडल्यास भाविक, पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पूल पाडण्याऐवजी याच पुलाची योग्य दुरुस्ती करण्यात यावी. - सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

मेकॅनिकल गेटवर आक्षेप
होळकर पूल परिसरातील मेकॅनिकल गेटमुळे पूर नियंत्रित होईल का याबाबत अनेक शंका आहेत. गेट बसविण्यापूर्वी स्मार्ट सिटीने यापूर्वी गोदावरीला आलेल्या पुराचा आढावा घेणे गरजेचे आहे. - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...