आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघराच्या परिसरात मिरचीचा रात्री धूर करा, सुतळीबाॅम्ब फाेडा, राेज रात्री आलटून पालटून मळ्यातील शेतकऱ्यांनी फटाक्यांच्या लडी लावाव्यात, घराचा वरांड्यातील माेठे लाईटस लावून लख्ख प्रकाश ठेवा, हातात घुंगराच्या काठ्या, रेडीआे, माेबाइलवर माेठ्या आवाजात गाणे लावावे, असे वेगवेगळे प्रयाेग बिबट्याला पळविण्यासाठी रहिवाश्यांनी करावेत, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक तालुक्यातील दारणा नदीकाठावरील नानेगावसह विविध गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत. अनेक शेतऱ्यांच्या गायीचे वासरू, शेळ्या, मेंढ्याची शिकार केल्याच्या घटना घडत आहेत. नानेगाव येथील मनोहर बबन शिंदे यांची शेळी बिबट्याने फस्त केली, तर दिलीप मोरे यांचा कुत्रा फस्त केल्याने नागरिक भयभीत आहेत. ठिकठिकाणी रात्री बिबट्या घराच्या परिसरात आल्याचे दिसून आले आहे.
या प्रकाराने रहिवाश्यांमध्ये चिंतचे वातावरण असून जगजागृतीसाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या बैठका घेतल्या आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, वाहनचालक अशोक खानझोडे यांनी ग्रामस्थांची बैठका घेत त्यांचे प्रबाेधन सुरू केले आहे. लहान मुलांना एकट्याने खेळायला सोडू नये, पाळीव जनावरे गोट्यात बंदिस्त करावे, रात्रीचे शेतीचे कामे समूहाने मिळून करावेत, हातात घुंगरांचा काट्या, रेडिओचा आवाज, मोबाईल चे गाणे, तोंडाने बडबड करने सुरूच ठेवले आहे. बिबट्या दिसलाच तर टोल फ्री नंबर १९२६ किंवा जवळच्या वनविभागाला संपर्क करावा असे आवाहन केले.
अशी घ्या काळजी
बिबट्यासह वन्यप्राण्यांचे छायाचित्र माेबाइलमध्ये काढण्यासाठी जीव धाेक्यात घालू नये.
व्हिडीआे काढून ताे साेशल मीडियावर व्हायरल करू नये.
बिबट्यांचे फाेटाे व्हायरल करणाऱ्यांविराेधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.