आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आला होता, पण...!:नांदेड कुर्ला हॉलिडे एक्सप्रेसच्या दोन बोग्यांखालून धूर; प्रवाशांच्या धावत्या रेल्वेतून उड्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड कुर्ला हॉलिडे एक्स्प्रेस (074 28) रेल्वे गाडीच्या दोन बोग्यांखालून अचानक धूर निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. उगाव (ता. निफाड) रेल्वे स्थानकात ही गाडी साखळी ओढून थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी व जागृत प्रवाशांनी अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करून तब्बल 35 मिनिटानंतर ही गाडी नाशिक साठी मार्गस्थ झाली.

दरम्यान गाडीतून धूर निघू लागल्यावर दोन ते तीन प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या घेतल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास नांदेड कुर्ला हॉलिडे स्पेशल ही गाडी नाशिकसाठी मार्गस्थ झाली. लासलगाव रेल्वे स्थानकातून ही गाडी निघाल्यानंतर या गाडीच्या इंजिनपासून पाचव्या आणि सहाव्या बोगीच्या म्हणजेच S3 आणि S4 या दोन भोगीतून मोठ्या प्रमाणावर खालच्या बाजूने धूर निघाला. सुरुवातीला प्रवाशांना डिझेल इंजिनचा दूर असावा असे वाटल्याने प्रवाशांनी दुर्लक्ष केले, पण नंतर धुळ्याचे लोळ उठू लागले. त्यानंतर मात्र या गाडीच्या खालील बाजूने भोगी घालून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रवाशांनी तात्काळ गाडीची साखळी ओढली.

गाडी उगाव रेल्वे स्थानकाजवळ पोचली. गाडी चालकाला इशारा मिळाल्यानंतर त्याने तात्काळ उगाव रेल्वे स्थानकात ही गाडी थांबली. त्यानंतर धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी या दोन्ही भोगीतून पटापट खाली उतरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जवळपास पाच ते सहा बोगीमधील प्रवासी उभे होते.

रेल्वे प्रवासी आणि जागृत नागरिकांनी तात्काळ या दोन्ही भोगींचा ताबा घेतला आणि खालील बाजूने अग्निप्रतिरोधक यंत्रणा हरियाणवीस केली. अग्निरोधक पावडर सोडण्यात आली त्यानंतर हा धूर आटोक्यात आला. भोगीच्या खाली असलेल्या लायनिंग वायर झाल्यामुळे हा धूर निघाल्याचे सांगण्यात येते तब्बल पस्तीस मिनिटानंतर हा धूर संपला आणि गाडीने नाशिककडे प्रस्थान ठेवले.

बातम्या आणखी आहेत...