आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लष्करासाठीच्या विदेशी मद्याची तस्करी करणारा अटकेत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यदलासाठी असलेल्या मद्याची तस्करी करणाऱ्या खासगी इसमाला अटक करण्यात आली. गुरुवारी (दि. १५) देवळाली कॅम्प परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. कारमधून तीन लाख १८ हजारांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी शाम कोटमे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक गस्त करत असतांना लष्करातील सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली.

एका कारमधून सैन्यदलाकरिता असलेल्या विदेशी मद्याची तस्करी होत असल्याचे सांगितले. पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित कार एमएच १५ डीएस ४६८१ उभी दिसली. कारचालकाला नाव विचारले असता त्याने प्रकाश जगदीश गुप्ता (५८, रा. लॅमरोड) असे नाव सांगितले. पथकाने कारची झडती घेतली असता कारमध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...