आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रमांचा आढावा:आयमा च्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमीलन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चा ३६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. स्नेहमीलन कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. सचिव गोविंद झा यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. औद्योगिक संघटनवाढ तसेच उद्योजक व कामगारांच्या हितासाठी आयमाने आतापर्यंत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सादर केला.

उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यास आयमा कार्यरत असल्याचे सरचिटणीस ललित बूब यांनी यावेळी नमूद केले. आयमाचे माजी अध्यक्ष भास्कर कोतवाल, विजय तलवार, जे. आर. वाघ, बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, एस. एस. आनंद, एस. एस. बिर्दी, वरुण तलवार, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी जे. सी. बोरसे, रवींद्र केडिया, नामदेव पवार, प्रकाश ब्राह्मणकर तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सहसचिव योगिता आहेर, राजेंद्र कोठावदे, धनंजय बेळे आदी यावेळी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...