आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आदर्श संस्कारातून समाजनिर्मिती; युवा संमेलनात सिद्धार्थ मुनी व शालीभद्र मुनी महाराज यांचे प्रतिपादन

सिडकाे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात येणाऱ्या नवीन पिढीला संस्कारी बनवले तर तीच पिढी तुमच्या म्हातारपणाची काठी बनेल. धर्म जगला तर समाज जगेल लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी धर्मामध्ये रुची घेऊन अध्ययन करावे तरच आदर्श समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन सिद्धार्थ मुनी व शालीभद्र मुनी महाराज यांनी केले. सिडको जैन महासंघ व नवकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मचक्र विल्होळी जैन मंदिर येथे १८ व्या जैन युवक राष्ट्रीय संमेलनाची सांगता झाली. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सिद्धार्थ मुनीजी महाराज यांनी युवकांसाठी मार्गदर्शन केले.

गोमातेपासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे असून गाेमातेला राष्ट्रीय माता म्हणून घोषित करण्यात यावे. समाजामध्ये वाढणाऱ्या तलाक तसेच छोट्या छोट्या कारणांनी होणारे कौटुंबिक वाद नकोत. अहिंसावादी बनून जगाची सेवा करा. मांसाहार तसेच मद्यप्राशन या कुव्यसनांपासून लांब रहा, असे मार्गदर्शन व सूचना महाराजांनी केली.

संमेलनाची सांगता महामांगलेच्या कार्यक्रमाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून सतीश लुंकड, अशोक बाफना, मदनलाल चोरडिया, विशाल जैन, सोनल मंडलेचा, विलास शहा, शरद शहा, नरेंद्र गोलिया, राजू शहा, राजेद्र चोरडिया, मंगलचंद सांखला, नंदू साखला, अनिल कर्नावट, ओस्तवाल दादीजी उपस्थित होते. हेमा लोढा, लीना बंब, दर्शना सुराणा, शांतीलाल वांबोरी, संजय कर्नावट, मोहनलाल चोरडिया, नंदलाल लुनावत, जवरीलालजी डुगरवाल, प्रकाश ललवाणी, भन्साळी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...