आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंधर्वनगरी परिसरात बालाजी मंदिर हे अतिक्रमित असल्याचे स्थानिक नगरसेवकाने तक्रार केली, म्हणून न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने कारवाई करीत हे मंदिर हटविले, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. मंदिर होते तेव्हा परिसरात शांतता, स्वच्छता, तसेच टवाळखोरांचा उद्रेक नव्हता. मंदिर हटविल्यानंतर या परिसरात टवाळखोरांचा उद्रेक वाढला असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘श्री बालाजी मंदिर पुनर्बांधणी व्हावी, याबाबत आपले मत काय’ असा सवाल करणारा फलक गंधर्वनगरीत लावत मंदिराचे फायदे-तोटे यात सांगितले आहे.
पालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार नाेव्हेंबर २०१६ मध्ये विविध मंदिरांचे अतिक्रमण काढले होते. परंतु सध्या नाशिक शहरातील पालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून त्याकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. नाशिकरोड परिसरातील गंधर्वनगरी येथील श्री बालाजी मंदिर हे पुन्हा बांधण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी यासाठी या परिसरातील पदाधिकाऱ्यांनी सामाजिक चळवळ सुरू केली आहे.
११ डिसेंबरला स्वाक्षरी मोहीम बालाजी मंदिर उभारण्यासाठी पालिकेने परवानगी द्यावी, यासाठी ११ डिसेंबर रोजी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर परिसरात अर्ज देऊन मंदिर हवे की नाही याबाबत जनमत घेतले जाणार आहे. जमलेले अर्ज हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले जातील.
परिसर झाला बकाल ज्यावेळी मंदिर होते, त्यावेळी परिसरात धार्मिक वातावरण होते. परंतु, मंदिर गेल्यानंतर या परिसराला बकालपणा आला असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अस्वच्छता वाढली असुन टवाळखोरांचा अड्डा तयार झाला आहे. - संग्राम फडके, सामाजिक कार्यकर्ते
मंदिरांमुळेच संस्कृती टिकून छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांनी मंदिरांचा जीर्णाेद्धार करून आपली हिंदू संस्कृती टिकविली. आताही या ठिकाणी कायदेशीर बाबी पूर्ण करून मंदिर उभारण्यात यावे. त्यामुळे परिसरातील वातावरण हे स्वच्छ रहाण्यास मदत होईल. तसेच हिंदू संस्कृती टिकून राहण्यास मदत होईल. -महंत अनिकेत शास्त्री देशपांडे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.