आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पेडर टू सक्सेस या अमेरिकन संस्थेतर्फे सामाजिक कार्य; डी. एस. काेेठारी शाळेत सायकली वाटप

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन साेसायटी संचलित नाशिकराेड येथील डी. एस. काेेठारी कन्या शाळेत गरजू विद्यार्थिनींना ‘पेडर टू सक्सेस’ या अमेरिकन संस्थेतर्फे सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वयक डाॅ.स्मिता ठागणे हाेत्या.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, माजी सहायक पाेलिस आयुक्त अशाेक पाटील, डाॅ. चंद्रशेखर ठाणगे, संध्या पाटील, सुषमा साळुंखे, कार्यवाह राजेंद्र निकम, संस्थेच्या क्रेडिट साेसायटीचे सेक्रेटरी साहेबराव पवार, मुख्याध्यापिका कुंदा जाेशी, पर्यवेक्षक केशव उगले, रवींद्र पगार उपस्थित हाेते. जगभरात गरजू विद्यार्थिनींना ‘पेडर टू सक्सेस’ या संस्थेतर्फे सायकली वाटप केल्या जातात. ज्ञानाचा वसा विद्यार्थिनींनी पुढे चालवावा, असे आवाहन डाॅ. स्मिता ठाणगे यांनी केले. स्मिता चाटे या विद्यार्थिनीने मनाेगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका कुंदा जाेशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपशिक्षिका निरुपमा ठाकूर यांनी करून दिला. सूत्रसंचालन दिनेश देवरे यांनी केले. केशव उगले यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...