आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिराधार, वंचीत महिला, मुले, आदिवासी, पर्यावरण आणि पशूपक्षी अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून चौफेर समाजसेवा करणारे रमेश अय्यर हे ‘नाशिक सिटीझन्स फोरम’च्या ‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्काराचे जुलै महिन्यातील मानकरी ठरले आहेत. आपल्या निरलस आणि अखंडीत सेवाकार्यातून समाजाला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास प्रवृत्त करणारे अय्यर हे एक प्रकारे ‘अनसंग हिरो’च आहेत.
नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे दर महिन्याला ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’हा पुरस्कार घोषित केला जातो. या पुरस्काराचे जुलै महिन्यातील मानकरी अय्यर ठरले आहेत.
मल्टीनॅशनल कंपनीतील सीईओची नोकरी सोडून नाशिकला स्थायिक होत 1995 सालापासून अय्यर यांनी समाजकार्याला वाहून घेतले. निराधार आणि वंचित महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी तसेच या महिलांच्या मुलांची शैक्षणीक वाटचाल सुकर व्हावी म्हणून श्री. अय्यर विविध स्तरांवर श्री. अय्यर यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केलेले काम स्तिमीत करणारे आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिसरातील आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी लक्षणीय काम केलेले आहे. पर्यावरणरक्षण आणि जखमी झालेले जंगली पशू आणि पक्षी यांची सुश्रृषा हेही अय्यर यांचे दीर्घकाळापासून चाललेले काम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.