आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशक्य हा मज शब्द न माहित:पित्यापाठोपाठ पुत्रही आयर्नमॅन; नाशिकच्या रोहितचा अमेरिकेत यशाचा झेंडा

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधल्या सातपूरचा रोहित पवार याने आयर्नमॅन स्पर्धेत यशाचा झेंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे रोहितचे वडील सुभाष पवार यांनीही गेल्याच वर्ष ही स्पर्धा जिंकली होती. या दुग्धशर्करा योगाने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

जलद आयर्नमॅन

गेल्यावर्षी मेक्सिको येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत 66 वर्षांच्या सुभाष पवार यांनी विजय मिळवला होता. भारतातील वयोवृद्ध आणि जलद आयर्नमॅन ते ठरले होते. निर्धारित वेळेच्या 2 तास आधीच त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. आता अमेरिकेतील मोइंग येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्यांचा मुलगा रोहित पवार याने विजय मिळवला आहे. या विजयामुळे नाशिकमधीलच नव्हे तर भारतातील ते एकमेव आयर्नमॅन बापलेक ठरले आहेत.

असे मिळवले यश

रोहित याने रविवारी (12 जून) अमेरिकेतील देश मोइंग येथे झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत तबल 14 तासांचे खडतर प्रयत्न केले. यात त्यांनी 1 तास 25 मिनिटात 4 किमी स्वीमिंग, 6 तास 52 मिनिटांत 180 किमी सायकलिंग यासह 5 तास 50 मिनिटांत 42 किमी रनिंग पूर्ण केले. त्यामुळे नियोजित वेळेच्या 2 तास 28 मिनिटे आधीच ही स्पर्धा पूर्ण झाल्याने त्यांनी विजय पताका फडकवली.

व्यायाम, आहारावर लक्ष

रोहीतचा जन्म नाशिकलाच झाला असून त्याचे शिक्षण येथील सेंट फ्रान्सिस शाळेत झाले आहे. पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये त्यांनी बीई पूर्ण केले. ते अमेरिकेत फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी व्यायाम व आहारावर लक्ष केंद्रित करून ही स्पर्धा जिंकत नाशिकचे नाव उंचावले आहे.

बातम्या आणखी आहेत...