आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकाचा कंपनीच्या गेटवरच चाकू व तलवारीने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी घडली. आईला कामावरून काढून टाकल्याने अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलानेच हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार निवृत्ती आहेर (५०, रा. महात्मानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश रामचंद्र सूर्यवंशी (१९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी आहेर आपल्या चारचाकीतून गेटवर उतरत असताना, अगोदरच दबा धरून बसलेले ३ युवक थेट धावत येत आहेर यांच्यावर तलवार व चाकूने वार करू लागले. या हल्ल्यात आहेर गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. या सर्व प्रकाराने झालेल्या आरडाओरडीने कंपनीतील काही कामगार बाहेर पळत आले. हल्ल्यानंतर युवकांनी आपल्या हातातील हत्यारे तेथेच टाकून दुचाकीवरून धूम ठोकली.
एक हल्लेखोर जखमी
संशयित हल्लेखोरांनी तलवार, चॉपरचा वापर केला. आहेर यांना चॉपरचा वार करताना एका हल्लेखोराच्या मांडीवर घाव लागला. त्यामुळे आरोपीचे रक्त रस्त्यावर सांडले होते. जखमी संशयिताला दुचाकीने पळवून नेताना रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाच्या अधारे पोलिसांना एका खासगी रुग्णालयापर्यंत माग काढला. अविनाश रामचंद्र सूर्यवंशीला ताब्यात घेतले. इतर तीन संशयित अद्याप फरार आहेत.
चारित्र्यावर संशयाने पत्नीचा गळा चिरून खुनाचा प्रयत्न
नाशिकमधील दुसऱ्या घटनेत, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कटरने पत्नीचा गळा चिरून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर स्वत: भेदरलेल्या पतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याहून खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार सायंकाळी ४ वाजता म्हसरूळ शिवारातील रामकृष्णनगर येथे घडला. गंभीर जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. राजीव रतनसिंग ठाकूर (५०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
विवाहितेची आत्महत्या, नातेवाइकांचा खुनाचा आरोप
नाशिकच्या तिसऱ्या घटनेत, नांदूर गावात विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवार सकाळी उघडकीस आला. सोनाली अभिषेक देवकर (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नातेवाइकांनी तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप केला. यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, नांदूर येथील अभिषेक देवकरचे ३ वर्षांपूर्वी सोनालीसोबत लग्न झाले आहे. या दांपत्याला दीड वर्षाची मुलगी आहे. सकाळी तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या पती व सासूच्या लक्षात आले. दोघांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दवाखान्यात आलेल्या नोतवाइकांना मृत सोनालीच्या गाळ्यावर रक्ताचे डाग व पायावर जखमा असल्याने संशय आला. पती व सासूने गळा आवळून खून केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
लक्ष्मी रेसिडेन्सी येथील तिसऱ्या मजल्यावर राजीव ठाकूर व त्याची पत्नी संध्या राजीव ठाकूर (४५) हे दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत मारहाण केली. पेपर कापण्याच्या कटरने पत्नीच्या गळ्यावर वार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.