आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:लग्न करून देत नाही म्हणून मुलाने केली वडिलाची हत्या, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील घटना

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न करून देत नाहीत म्हणून एका तरुणाने पित्याची निर्घृण हत्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे शुक्रवारी रात्री घडली.

याबाबत असे की, माझे लग्न का करून देत नाही म्हणून जऊळका येथील प्रमोद धर्मा भारती वय २७ याने दि. ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान वडील धर्मा भारती ( वय ६५) यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान त्याने कुऱ्हाडीने डोक्यात व पायावर वार करून गंभीर जखमी केले.

याबाबतची माहिती मृतकाची सून संजीवनी महादेव भारती या महिलेने जऊळका पोलिस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या धर्मा यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा रात्री दोन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा प्रमोद यास तत्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे व सहकारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...