आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगांना चालना:माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार; उद्याेगमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक दोनवरील भूखंडावर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले-आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्र्यांसह उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी , सचिव बबन वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, रतन पडवळ, स्टाइसचे नामकर्ण आवारे यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा झाली. वसाहतीचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. त्याकरिता टप्पा क्रमांक दोन मध्ये २०० एकर भूखंडावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात, भूखंडाचे वितरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली. याबाबत अधिकाऱ्यांना लेआउट करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.

एक हजार एकर भूसंपादनाची मागणी मापरवाडीजवळ एक हजार एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित केली आहे. त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून सुविधा निर्माण कराव्यात. भूखंडाचे वितरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. उद्योजकांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध व्हावी याकरिता वसाहतीत ३३/११ केव्हीए वीज उपकेंद्राकरिता प्लॉट उपलब्ध करून देण्यात यावा. वसाहतीतील मुकुंद कारखान्याचा ४२ एकर जागेवर प्लॉट तयार करून उद्योजकांना देण्यात यावेत अशी मागणी केली.

‘या’ मागण्या लगेचच मान्य औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्ता चारपदरी करण्यात यावा, अशी मागणी बबन वाजे यांनी केली. सावंत यांनी ती मान्य केली. औद्योगिक वसाहतीतील कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लगेचच आदेश देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...