आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ध्वनिक्षेपकास आजपासून रात्री १२ पर्यंत परवानगी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना सोमवार (दि.५) ते शुक्रवार (दि.९) असे सलग पाच दिवस मध्यरात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याशिवाय नवरात्रोत्सवात दोन दिवस तर दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी असणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी हे आदेश काढले आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक आदींच्या वापराबाबत सूट जाहीर करण्याकरिता जिल्हास्तरावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात जिल्ह्यातील दहा प्रमुख उत्सवांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर्स वाजवण्याची मुभा देण्यात आली असल्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी १ जानेवारीला काढले होते. या आदेशानुसार गणेशोत्सव काळात केवळ ८ व ९ सप्टेंबर असे दोन दिवसच रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी दिली होती. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस वाढीव परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे होत होती. त्यानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकचे तीन दिवस ध्वनिक्षेपक रात्री १२ पर्यंत वाजवण्यास परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...