आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य टेनिस संघटनेतर्फे सुहाना स्मार्ट राज्य ज्युनियर मानांकन टेनिस स्पर्धा नाशिक जिल्हा संघटनेद्वारे येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यातील विविध भागातून १० वर्षे वयोगटातील मुले व मुली या स्पर्धेत सहभागी झाले. यात सोलापूरच्या स्पर्श पाटीलने मुलांमध्ये तर मुलींमध्ये नवी मुंबईच्या रूमी गदियाने विजेतेपद मिळविले. त्यांनी महत्त्वाचे राज्य मानकांचे गुण मिळवून आपले राज्य मानांकन स्थान वरती नेले.
विजेतेपद मिळविताना स्पर्धेच्या अंतिम फेरीमधे सोलापूरच्या स्पर्श पाटील याने आक्रमक खेळाच्या जोरावर नाशिकच्या अर्चन पाठक वर ४-२,४-० असा विजय मिळविला तर मुंबईच्या रूमी गदियाने अत्यंत संतुलित परंतु सातत्य पूर्ण खेळ करत नाशिकच्या अनिका श्रीवास्तवर ४-१,४-१ अशी मात करून स्पर्धेचे विजेते पद मिळविले विशेष म्हणजे दोन्ही गटात नाशिकच्या खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व उपविजेतेपद मिळवून स्पर्धा आयोजकांचा उद्देश सार्थ ठरविला. विजेत्या खेळाडूंना जिल्हा टेनिस संघटनेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ टेनिसपटू गोविंद बेळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
विजेत्यांना राज्य संघटनेचे मानांकन गुण व सुहाना स्मार्ट सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे गोविंद बेळे व स्पर्धा निरीक्षक अपूर्वा रोकडे यांचे स्वागत जिल्हा संघटनेचे खजिनदार समीर कपूर यांनी केले तर स्पर्धा संचालक अद्वैत आगाशे यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे गोविंद बेळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. जयदीप वैशंपायन यांनी करताना सदर स्पर्धा आयोजनाकरिता संघटना अध्यक्ष व राज्य संघटना उपकार्याध्यक्ष राजीव देशपांडे व राष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले स्पर्धा यशस्वी करण्याकरिता गोरख खैरनार, गोविंद साळुंखे आदींनी प्रयत्न केले. याप्रसंगी नाशिकमधील विविध ठिकाणी खेळणारे टेनिस खेळाडू पालक टेनिसप्रेमी उपस्थित होते व नाशिकमध्ये नाशिक जिल्हा टेनिस संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक स्पर्धा आयोजित होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.