आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर‎:विद्यार्थ्यांच्या नवीन आधार कार्ड‎ व अपडेटसाठी विशेष शिबिर‎

इंदिरानगर‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय मुलांच्या आधार कार्ड अपडेट व काही आधार ‎कार्डमधील दुरुस्त्या करण्यासाठी व नवीन आधार कार्ड‎ काढून देण्यासाठी देवानंद बिरारी व विनाेद दळवी यांच्या‎ मार्फत स्वतंत्र माेफत शिबिर साेमवार (दि. ६) पासून सुरू ‎करण्यात येत आहे.‎ वडाळा-पाथर्डी राेडवरील गजानन महाराज‎ मंदिरासमोरील वन-वैभव कॉलनी येथील शिवसेना ‎कार्यालयावर सकाळी ९:३० ते ५:३० या वेळेत शिबिर हाेत‎ आहे.

यामध्ये नविन आधार नोंदणी, नाव बदलणे, मोबाइल नंबर लिंक करणे, ई-मेल लिंक करणे, फोटो बदल व ‎बायोमेट्रिक स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‎ ‎जन्मदाखला, पत्ता बदल, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदार ‎ओळख पत्र, फोटो सहित, रहिवासी पुरावा, लाइट बिल या‎ पैकी कुठलेही २ कागदपत्रे आवश्यक आहेत.‎

अपडेट करणे आवश्यक‎
शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड‎ अपडेट करावे, यामध्ये वयवर्ष ५,‎ १५, १८ वर्षांनंतर आधार कार्डवरील‎ फोटो, बायोमेट्रिक, मोबाइल नंबर,‎ मेलआयडी अपडेट करणे‎ आवश्यक आहे. पाच ते पंधरा‎ वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक‎ अपडेट व नवीन आधार कार्ड‎ काढणे मोफत करून दिले जाणार‎ आहे. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात‎ प्रवेश घेणे, शिष्यवृत्तीसाठी अपडेट‎ महत्त्वाचे असल्याने गरज लक्षात‎ घेता हे शिबिर घेण्यात येत‎ असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...