आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:भावनिक प्रगती होण्यासाठी विशेष प्रयत्न; विद्यार्थ्यांनी व्हावे सृजनशील

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांना वाव देत सृजनशील व्हावे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक प्रगती होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन श्रीधर पाटणकर यांनी केले. पुणे विद्यार्थीगृह संचालित काकासाहेब देशमुख विद्यालयाच्या सुवर्ण मोहत्सवी वर्ष उद्घाटन समारंभात तेबोलत होते. यावेळी विद्यालयाचे शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी कार्याध्यक्ष सुनील रेडकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन शिक्षकांना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनी प्रशंसा बिवलकर, समृद्धी सांगळे यांनी कथ्थकनृत्य सादर केले. यावेळी पुणे विद्यार्थिगृहाचे संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, डॉ. एकनाथ कुलकर्णी, संजय गुंजाळ, दिनेश मिसाळ, प्रवीण जोशी, डॉ. मुनशेट्टीवार, अजय अग्रवाल आदी उपस्थित होते. संस्थेचे कुलसचिव अमोल जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास शाळेचे सेवानिवृत्त मुख्यध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर निंबेकर, सूत्रसंचालन तेजश्री जोशी, तर आभार प्रदर्शन अर्चना केकाण यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...