आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयाेजन:150 गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करून देशसेवेसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत डी. कोतकर यांनी केले. नाशिकरोड लाडशाखीय वाणी मित्र मंडळाच्या विदयार्थी गुणवंत गौरव सोहळ्यात ‘भारत भाग्यविधाता, विश्व गुरू निर्माता’ या विषयावर त्यांनी प्रबोधन केले. या साेहळ्यात १५० विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर नाशिकरोड वाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत शिरोडे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, विनोद दशपुते, वास्तुविशारद चंद्रकांत धामणे, सन्मित्र मंडळाचे गिरीश महाजन प्रमुख अतिथी होते. मंडळाला १२ वर्षे पूर्ण झाली असून ‘आझादी का अमृत महोत्सव’ या थीमवर हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत शिरोडे यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...