आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:30 लाख विद्यार्थी चिंतेच्या गर्तेत, एका वर्गात 25 जणांची व्यवस्था; पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी असणार स्वतंत्र व्यवस्था, विभागीय केंद्रांना सूचनांची प्रतीक्षा

नाशिकएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एका वर्गात २५ विद्यार्थी : डॉ. दिनकर पाटील, संचालक, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

गेल्या वर्षी कोरोनाच्या लाटेतून वाचलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी मात्र दुसऱ्या लाटेत सापडल्या आहेत. परिणामी दहावी-बारावीच्या परीक्षांना बसलेल्या ३० लाख विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, एका वर्गात फक्त २५ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात येणार असली तरी नेमके नियोजन कसे असणार, याबाबत विभागीय मंंडळांना सूचनांची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्वपरीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी एरवी “कॉपीमुक्त’ परीक्षांचा नारा देणाऱ्या शिक्षण मंंडळापुढे यंदा “कोरोनामुक्त’ परीक्षांचे आव्हान बनले आहे.

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, विद्यार्थ्यांची तयारीही पूर्ण झाली. आता प्रश्न आहे तो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, या ३० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणार कशा हाच. करोडो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाला प्रथमच ही परीक्षा द्यावी लागत आहे. २३ एप्रिल ते ३१ मेदरम्यान होत असलेल्या या परीक्षांसाठी एका वर्गात २५ परीक्षार्थींची आसनव्यवस्था करून फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न मंडळातर्फे करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी वाढणाऱ्या परीक्षा केंद्रांचे आणि उपकेंद्रांचे नियोजन कसे करावे, याचे नियोजन अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत विभागीय मंडळांना राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार विभागीय पातळीवर परीक्षा समित्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र, कमी विद्यार्थ्यांच्या नियमाने वाढणाऱ्या परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्याचे आव्हान या समित्यांसमोर आहे. एखादा परीक्षार्थी पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची सूचना विभागीय मंडळांनी दिली आहे. मात्र, लहान जागेत असलेल्या केंद्रांवर या व्यवस्थेत अनेक अडचणी येण्याची चिंता शाळा महाविद्यालयांच्या प्रमुखांनी “दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातही याबाबत बरेच संभ्रम असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

एका वर्गात २५ विद्यार्थी : डॉ. दिनकर पाटील, संचालक, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी या परीक्षांचे नाते असल्याने कोरोना महासंसर्गाच्या संकटकाळात सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून ऑफलाइन परीक्षा घेण्याची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या वर्षी एकच पेपर शिल्लक होता, या वेळी पूर्ण परीक्षा कोरोनाकाळात घ्यायची आहे. त्यात संसर्गाचे प्रमाण अधिक वाढल्याने अनेक अडथळेही येत आहेत, हे मान्य करावे लागेल. त्यातून मार्ग काढले जात आहेत. तूर्तास, सुरक्षित अंतर राखण्यासाठी एका वर्गात फक्त २५ परीक्षार्थी असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी वाढणाऱ्या उपकेंद्रांचे नियोजन सुरू आहे.

मंडळासाठी प्रश्नपत्रिका

 • विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करावी लागेल?
 • असल्यास त्याचे नियोजन काय? एक अहवाल किती दिवस ग्राह्य धरणार? {
 • परीक्षा सुरू असताना संसर्ग झाल्याने अनुपस्थित विद्यार्थ्यांचे काय?
 • विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था, कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास काय?
 • कडक लॉकडाऊन असलेल्या परिसरातील केंद्रांचे काय?
 • परीक्षा केंद्रांना थर्मल गन, ऑक्सिमीटर कोण देणार?
 • निर्जंतुकीकरणाचा खर्च कुणी करायचा?
 • सुरक्षेच्या नियमांचे नियमन कोण करणार?
 • परीक्षापूर्व आरटीपीसीआर तपासण्या होणार?
 • मास्क व सॅनिटायझर कोण देणार?
बातम्या आणखी आहेत...