आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाचा पहिला टप्पा:दहावीत 40000 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य ; सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक 97.51 टक्के निकाल

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.३७ टक्के लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले आहे. तर ३३ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणी व १३ हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश पटकावले आहे. सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. तर देवळा, इगतपुरी, नांदगाव, येवला, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा निकाल ९७ टक्क्यांहून अधिक लागला आहे. नाशिक ग्रामीणचा निकाल ९६. ३५ टक्के तर महापालिका परिसरातील निकालाची टक्केवारी ९६.५१ टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.४२ टक्के मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारी ९७.४७ टक्के आहेत. राज्यात एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी २० ते २९ जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी २० जून ते ९ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

बातम्या आणखी आहेत...