आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांचा आदेश:पाणी अपव्यय, गळती रोखण्यासाठी  पालिकेचे 6 विभागांत विशेष पथक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणीचोरीची फोटोसहीत तक्रार केल्यास कारवाई

गंगापूर धरण समूहासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात जरी ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी असले तरी, सद्यस्थितीत शहरात अनेक ठिकाणी उन्हामुळे असमान पाणी वितरण होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी सहाही विभागात अधिकाऱ्यांची विशेष पथके स्थापन केली आहे. यात जलवाहिनी गळती झाल्यास अथवा अपव्यय होत असल्याचे नागरिकांनी फोटोसहीत हेल्पलाइनवर कळविल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहराला प्रामुख्याने ८० टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणातून, तर २० टक्के पाणीपुरवठा मुकणे आणि दारणा समूहातून होतो. मुकणे जलशुद्धीकरण केंद्रातून सिडको तसेच पाथर्डी फाटा आणि इंदिरानगरच्या काही भागात पाणीपुरवठा होत असून उर्वरित शहराला गंगापूर धरणातून पाणीपुर‌वठा होतो. महापालिकेसाठी गंगापूर धरण समूहातून चार हजार दशलक्ष घनफूट, मुकणेतून १५००, तर दारणा धरणातून १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. शहराला दररोज सरासरी ५२५ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याची उचल केली जात होती. परंतु, एप्रिल महिन्यातच यंदा उकाडा अधिक वाढल्यामुळे पाण्याची उचल वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने ५२५ वरून सध्या ५४१ एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा वाढला आहे. ही बाब लक्षात घेत जोरदार पाऊस येईपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत पालिका करीत आहे.

दरम्यान, शहरात अनेक भागात पाणीचोरी तसेच पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे असे प्रकार आढळल्यास किंबहुना जलवाहिनी गळती होत असल्यास त्याची तक्रार थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या भ्रमणध्वनी क्रमांकावर शक्यतो जिओ टॅगिंग असलेला फोटो, पूर्ण पत्त्यासह पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...