आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनाचे संतुलन हा योग आहे. याच संकल्पनेतून ऊर्जा संचलित सहस्रनाद वाद्यपथकाकडून एका विशेष योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग चाहत्यांनी चंद्राच्या साक्षीने सिंगिंग बोल साउंड मेडिटेशनद्वारे मन:शांतीची अनुभूती घेतली. फक्त शरीराचीच नाही तर मनाचीही स्थिरता हे योग आहे आणि त्याचीच अनुभूती योगप्रेमींना अमी छेडा यांच्या संकल्पनेतून घडली.
या तासाभराच्या कार्यक्रमात चंद्राला केंद्रिभूत ठेवून ओंकाराने प्रारंभ करण्यात आला. सीमा पाठक यांनी शीतली प्राणायाम घेतले, त्यानंतर १४ श्लोकांचे पठण करत चंद्र नमस्कार घेण्यात आले. चंद्र नमस्कार माधुरी धनवटे यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने करून घेतले.
मनःशांती व स्थैर्यासाठी उपयुक्त असे चंद्र नमस्कार झाल्याने त्या अलौकिक शांततेची अनुभूती दोनशे योगप्रेमींनी लक्षिका हॉल येथे घेतली. त्यानंतर लाइफ कोच स्मिता वानखेडे यांनी सिंगिंग बोलद्वारे गाइडेड मून मेडिटेशनची अनुभूती उपस्थितांना दिली. पौर्णिमेला शीतली प्राणायाम चंद्र नमस्कार व चंद्र ध्यान केल्याने त्याचे अत्याधिक फायदे होतो. काहीतरी नवीन लोकांना अनुभवता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन पथकाकडून करण्यात आल्याचे पथकप्रमुख शौनक गायधनी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.