आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनक्षोभ उसळण्याची शक्यता:पेठरोडवर 71 कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणासाठीच अट्टाहास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेल राऊ ते तवली फाट्यापुढील जवळपास साडेसहा किलोमीटरचा पेठरोडच्या नूतनीकरणासाठी डिसेंबर महिन्यात महापालिकेच्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याची संधी असूनही त्या दृष्टीने पावले उचलली जात नसल्यामुळे किंबहुना ७१ कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणासाठीच आग्रह धरला जात असल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी २५० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलासाठी किरकोळ तरतूद धरून सुधारित अंदाजपत्रकामध्ये नियोजन केल्याचे उदाहरण झाले असताना अत्यावश्यक पेठरोडबाबत तो फॉर्म्युला का लागू केला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे निधी असल्यामुळे काँक्रिटीकरणासारखा खर्चिक पर्याय योजण्यापेक्षा कमी निधीमध्ये डांबरीकरण का केले जात नाही? असाही सवाल केला जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पालिका रस्ते, ठेकेदार व काही राजकीय पुढाऱ्यांची युती चांगलीच वादात सापडली आहे. जेथे दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथे पालिकेकडून दुर्लक्ष होत असून त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे साडेसहा किमीचा उखडलेला पेठरोड ठरत आहे. पालिका हद्दीबाहेरून गुजरात सीमेपर्यंत पेठरोड हा काँक्रीटचा असल्यामुळे त्याला कनेक्टेड म्हणून पालिकेतील रस्ता ही काँक्रिटीकरणाचा असावा असा आग्रह धरला जात आहे. त्यासाठी ७१ कोटीचे प्राकलन तयार केले असले तरी हा निधी देण्याची परिस्थिती पालिकेची नाही. आ. राहुल ढिकले यांनी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांचा प्रतिसाद नाही. दुसरीकडे स्थानिक नागरिकांकडून आंदोलन सुरू झाल्याने भाजपाचे माजी नगरसेवक त्रस्त झाले आहेत.

..तर प्रशासन जबाबदार सुधारित अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून पेठरोडसाठी तातडीने डांबरीकरण करता येऊ शकते. जे शक्य असेल ते तत्काळ करून पालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा जनआंदोलनात झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. - आ. अॅड. राहुल ढिकले

बातम्या आणखी आहेत...