आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांतदादा मोरे यांचे मार्गदर्शन:धार्मिक व्रत, सणांच्या माध्यमातून आध्यात्मिक, वैज्ञानिक संदेश

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले पूर्वज संशोधक वृत्तीचे होते त्यांनी सणवारांची जी योजना करून ठेवली आहे त्यामागे विज्ञान आहे. यात कुठलीही अंधश्रद्धा नसून डोळसपणे प्रत्येक सण साजरा करून त्यामागील आपल्या संस्कृतीचा अमोल ठेवा, संदेश काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहाेचवायचा आहे, असे मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी केले. पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राची वास्तुशांती, वृक्षारोपण आणि दहीहंडी अशा संयुक्त सोहळ्यात उपस्थित हजारो सेवेकरी, भाविकांशी संवाद साधताना मोरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी नगरसेवक सुदाम ढेमसे, संजय नवले, डॉ. पुष्पा पाटील, एकनाथ नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रावण महिन्यापासून भारतभर सणवारांची लगबग सुरू होते आणि ती दिवाळीपर्यंत अखंडपणे सुरू असते. भारतीय संस्कृतीत वर्षभरच ही लगबग असते पण एकही सण, व्रत असा नाही की ज्यातून धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक संदेश नाही, असे सांगून या विषयावर विस्तृत चर्चा चंद्रकांतदादा मोरे यांनी केली. प्रशांतनगर परिसरात मंगल यात्रेचे आयोजन करण्यात आले. कलशधारी बालिका, मुली, ढोलपथक, तिरंगा हाती घेतलेल्या मुली या सर्व बाबींमुळे मंगलमय, भावपूर्ण वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली. या संदेश यात्रेचा समारोप कार्यक्रम स्थळी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...