आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयमाच्या स्वातंत्र्यता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद:550 हून अधिक उद्योजक,कामगार सहभागी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा) स्वातंत्र्यदिनी आयामा रिक्रिएशन सेंटर येथे ध्वजारोहण अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या हस्ते झाले.यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त क्रीडा समितीचे चेअरमन जयंत पगार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (15 ऑगस्ट ) आयोजित स्वातंत्र्यता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 550 हून अधिक लोक त्यात सहभागी झाले होते.

दौडमध्ये उद्योजक, कामगार,महिला यांनी सहभाग घेतला.1 कि.मी.,2 कि.मी.आणि 5 कि.मी.अशा 3 गटांसाठी ही दौड होती.विजेत्या स्पर्धकांना आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, बीओटी चेअरमन धनंजय बेळे,सरचिटणीस ललित बूब तसेच मान्यवर पाहुणे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,कार्यकारी अभियंता जे.सी.बोरसे एरिया मॅनेजर साळी,महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या हस्ते बक्षिसे, ट्रॉफी तसेच स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.उद्योजक व कामगारांसाठी आमचे काही दायित्व आहे हे लक्षात घेऊन व त्यांचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशानेच या दौडचे आयोजन करण्यात आले होते.या सर्वांनी दौडला दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा असल्याचे निखील पांचाळ आणि बीओटी चेअरमन आपल्या भाषणात म्हणाले तर आयमातर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी तोंडभरून स्तुती केली.

दौडच्या यशस्वीतेसाठी गोविंद झा,हर्षद बेळे, राहुल गांगुर्डे,अभिषेक व्यास व कार्यकारिणीने प्रयत्न केले स्पर्धेत सहभागी झालेल्यांना आकर्षक टीशर्ट देण्यात आले होते.माजी अध्यक्ष बी.ई. कोतवाल,जे आर वाघ,राजेंद्र अहिरे संदीप सोनार, ज्ञानेश्वर गोपाळे, वरूण तलवार,एस.एस.आनंद, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,सुदर्शन डोंगरे,सचिव गोविंद झा,योगिता आहेर,खजिनदार राजेंद्र कोठावदे,प्रमोद वाघ,राधाकृष्ण नाईकवाडे,दिलीप वाघ,अविनाश मराठे,जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील,जयंत जोगळेकर,देवेंद्र राणे, अविनाश बोडके,हर्षद ब्राह्मणकर,विराज गडकरी , मेघा गुप्ता,हेमंत खोंड,रवींद्र झोपे,के एन पाटील मनीष रावल,सुमीत बजाज,कुंदन डरंगे,सारिका दिवटे,धीरज वडनेरे,देवेंद्र विभुते,अशोक ब्राह्मणकर,अजय यादव,मनोज मुळे,संजय देशमुख आदींसह उद्योजक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरचिटणीस ललित बूब यांनी आभार मानले.

पहिल्यांदाच अशा प्रकारचे आयोजन

उद्योजक आणि कामगार यांकरिता पहिल्यांदाच अशा संयुक्त रॅलीचे आयोजन शहरात केले गेले. आयमाच्या सदस्यांसह विविध उद्योगातील कामगारांनी देखील यात हिरीरीने सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...