आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना बुधवारी (दि. १) पाेलिस परेंड ग्राउंड येथे प्रारंभ झाला. आदिवासी विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांनी खेळामध्येही प्रावीण्य मिळवावे.
मागील दोन वर्षांत कोरोना परिस्थिती असल्याने आदिवासी विकास विभागांतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या नाहीत. परंतु यावर्षी प्रकल्पस्तर विभागस्तर व राज्यस्तर अशा विविध पातळीवर खेळाडूंना आपले खेळ गुण दाखविण्याची संधी मिळाली असल्याने या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळामध्ये चांगली कामगिरी करून आपला सहभाग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निश्चित करावा. विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये आदिवासी विकास विभागातील नाशिक, कळवण ,धुळे, नंदुरबार, तळोदा, यावल व राजूर या सात प्रकल्पांतर्गत २१३ शासकीय व २११ अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण २८३१ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.या क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल सह विविध वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश आहे. या क्रीडा स्पर्धा यशस्वी खेळाडूंचे विविध क्रीडाप्रकारात गुणांकन करण्यात येणार असुन प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची निवड राज्यस्तरीय क्रीडास्पर्धाकरिता होणार आहे.
खेळाडूंनी खेळभावनेने सहभागी होऊन खेळाचा गौरव वाढवावा.खेळाडूनी आपल्या विभागाचे नाव उंचवावे शासकीय नोकरीत खेळाच्या गुणांना महत्त्व असुन त्यादृष्टीने खेळाडुनी खेळात आपले सर्वोत्तम द्यावे असे आपल्या प्रास्ताविकात स्पर्धांचे आयोजक अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली. विद्यार्थी जीवनात बौद्धिक विकास होण्यासाठी अभ्यास आणि शारिरीक व मानसिक विकास होण्यासाठी खेळ गरजेचे आहे , असे मार्गदर्शन सहा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व प्रकल्पातील खेळाडूंनी भोसला मिलिटरी स्कूलच्या बॅण्ड पथकासोबत संचलन केले त्यानंतर शासकीय आश्रमशाळा टिटवे येथील खेळाडूंनी रिदमिक योगा व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी म्युझिकल गेम परफॉर्मन्सने उपस्थितांची व खेळाडूंची मने जिंकली.
या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या प्रभारी संचालिका अनिता पाटील, उपसंचालक डॉ. शिवाजी पवार, प्रदीप जाधव, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदी उपस्थित हाेते. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितिन रहमान यांनी कार्यक्रमाचे आभार प्र दर्शन केले. तसेच उद्धव काळापहाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.