आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय युवा क्रीडा महाेत्सव:मुक्त तर्फे पुढील सप्ताहात क्रीडा महाेत्सव

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे केंद्रीय युवा क्रीडा महोत्सव या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये विद्यापीठ परिसरात होत असून त्यासाठी विद्यापीठाच्या मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड, कोल्हापूर व पुणे या विभागीय केंद्रांवर १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिली.

यावर्षीचा आंतरविद्यापीठ स्तरावरचा क्रीडा महोत्सव डिसेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे केंद्रीय क्रीडा महोत्सव या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये विद्यापीठ परिसरात होत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अमरावती व औरंगाबाद विभागीय केंद्रावर १२ नोव्हेंबरला, मुंबई, कोल्हापूर, नाशिक केंद्रांवर १३ नोव्हेंबरला तर नागपूर व नांदेड येथे १४ नोव्हेंबरला विभागीय क्रीडा महोत्सव होईल.

विभागीय केंद्रावरील स्पर्धेतून केंद्रीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. केंद्रीय क्रीडा स्पर्धेतून निवडलेला अंतिम संघ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सहभागी होईल. हा क्रीडा महाेत्सव आैरंगाबादला हाेईल. विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या विभागीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यार्थी कल्याण केंद्राच्या प्रमुख प्रा. विजया पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...