आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेला घरातून हाकलले; पतीवर गुन्हा

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीनिमित्त नाशिकला पाठविलेल्या विवाहितेला पतीसह सासरच्यांनी घरात घेण्यास नकार दिला. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घर घेण्यासाठी वडिलांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून १० लाखांची मागणी करत छळ केल्याच्या प्रकरणात पतीसह सासरच्यांवर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार पती, सासू, सासरे, दीर, आजेसासू आणि चुलत सासरे, नंदोई यांनी संगनमत करत लग्नात हुंडा न दिल्याने तुझ्या आई-वडिलांची समाजात बदनामी करू, अशी धमकी देत नोकरीनिमित्त नाशिकला पाठविण्याचा बहाणा करत विवाहितेला घरात घेण्यास नकार दिला. याप्रकरणी पाेलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...