आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पथकाची कारवाई; 80  दुचाकी हस्तगत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थापलेल्या पथकांनी चोरी झालेल्या ८० दुचाकींचा शोध लावत २६ लाख ८५ हजारांच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. परिमंडळ १ मधील भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गं‌गापूर, पंचवटी, आडगाव म्हसरुळ ठाण्याच्या हद्दीत व परिमंडळ २ मधील नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, सातपूर, इंदिरानगर, या पोलिस ठाण्यासाठी दोन पथके स्थापली.

पथकांकडून पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास केला जातो. परिमंडळ २ च्या पथकाने २ विधी संघर्षीत बालकांसह १९ दुचाकी चोरांना अटक केली आहे.पथकाचे अविनाश देवरे, केतन कोकाटे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...