आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:श्रीरामाचा जन्म हा आदर्श आचारणासाठी ; सातपूरच्या रामकथेत ढाेक महाराजांचा उपदेश

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्णाचा अवतार हा दैत्यांच्या किंवा वाईट प्रवृत्तीच्या नायनाटासाठी झाल्याचे सांगण्यात येते, त्याचप्रमाणे श्रीरामाचा जन्म हा सतमार्ग, आदर्श आचरण, जगाच्या कल्याणासाठी किंबहुना जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी झालेला आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांनी केले,सातपूर येथील श्रमिकनगरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या पटांगणावर रामराव महाराज ढोक यांच्या श्री रामकथा तथा श्री रामायण कथेला प्रारंभ झाला. श्रीराम हे आदर्शाचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे शिव-विष्णू ही दोन्ही तत्त्वे एकच असल्याचे ढाेक महाराज म्हणाले.

हरि-हर भेद नाही, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेसम, असे सांगून त्यांनी शिव आणि वैष्णवपंथीयांमध्ये वाद होऊ नये. श्रीराम कथेच्या आधी शिवकथा येते ही एक कथा श्रवण करणे एक परीक्षा वाटत असली तरी त्यामागे जीवाचे कल्याण हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. श्रद्धा आणि विश्वास यातील फरक स्पष्ट केला. मनुष्याचे गुण कळले तर श्रद्धा वाढते. जीवनात परीक्षा वृत्तीपेक्षा जिज्ञासू वृत्तीला महत्त्वाचे स्थान आहे, असेही ते म्हणाले. श्रीराम कथेत श्री.रामजन्माचा प्रसंग आला तेव्हा व्यासपीठावर फुलांनी सजवलेला पाळणा ठेवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी श्रीरामाचा जयघोष करीत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, तसेच पुष्पवृष्टीदेखील केली.हार्मोनियमवादक व मुख्य गायक काशीनाथ महाराज पाटील (जळगाव), सहगायक विठोबा महाराज सूर्यवंशी हाेते.

बातम्या आणखी आहेत...