आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यसन्मान:'स्त्रीकुसाच्या कविता' व 'गुलमोहराचं कुकू'ला श्रीशब्द काव्यपुरस्कार; 70 कवितासंग्रहातून निवड

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्फूर्ती साहित्य संघ, नेज, हातकणंगले यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय 'श्रीशब्द' काव्य पुरस्कार गुरुवारी 9 जून रोजी जाहीर करण्यात आला. या वर्षीचा पुरस्कार कवी लक्ष्मण महाडिक यांच्या 'स्त्रीकुसाच्या कविता' आणि विशेष साहित्य पुरस्कार प्रशांत केंदळे 'गुलमोहराचं कुकू' यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

70 कवितासंग्रह प्राप्त

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील पुरस्कारासाठी कवितासंग्रह कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, पुणे , सातारा, बेळगांव, कोकण, अमरावती, मुंबई, नाशिक, अकोला अशा अनेक ठिकाणाहून 70 कवितासंग्रह प्राप्त झाले. कवी सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने नुकताच आपला निकाल दिला.

यामध्ये सत्यभामा पोतदार यांच्या स्मृतीत दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. लवकरच पुरस्कार वितरण समारंभपूर्वक करणार असल्याचे स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष कवी प्रा.डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...