आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदवड तालुक्यात एसटी बस झाडाला धडकली:कंडक्टर महिलेसह दोघी ठार, 13 प्रवासी जखमी, उपचार सुरू

चांदवड (जि. नाशिक)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरीहून मनमाडकडे जाणाऱ्या एसटी बसने चांदवड तालुक्यातील मतेवाडी शिवारात वडाच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहक महिलेसह दोघी ठार झाल्या, तर बसमधील १३ प्रवासी जखमी झाले आहेत. यात गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छायाचित्रात चांदवड-देवळा रस्त्यावर वाहकाच्या बाजूने अर्धी कापली गेेलेली अपघातग्रस्त बस. (इनसेटमध्ये मृत महिला वाहक सारिका लहरे.)