आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचारी वर्षापासून कोरोना प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित:महाव्यवस्थापकांनी मंजुरी दिली, पण पैसेच मिळाले नाहीत

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना महामारीच्या काळात संचारबंदी असतानाही राज्य परिवहन मंडळ प्रशासनाच्या आदेशानुसार 23 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राेत्साहन भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्राेत्साहन भत्ता अदा करण्यास 29 ऑक्टाेंबर 2021 राेजी राज्य परिवहन मंडळाच्या महाव्यवस्थापकांनी मंजुरी दिलेली होती.

परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

नाशिक विभागातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशानुसार काेविड काळात कुटुंबियांची आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. या कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांच्या परिपत्रकानुसार प्राेत्साहन भत्ता देणे बंधनकारक आहे. असे असतानाही राज्य परिवहन मंडळ हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

विभाग नियंत्रकांकडे दाद

या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विभाग नियंत्रक आदींकडे दाद मागितली आहे. प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास याेग्य त्या प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा इशारा संदीप बागुल, सुनील पवार, रामभाऊ भालके, राजेंद्र महाले, साेमनाथ पालवे, रवींद्र मगर, विजय माेरे, निवत्ती गायकवाड, शरद पाटील, निवृत्ती भाेये आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...