आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Nashik
 • St Workers Stricke | Marathi News | ST Merger Decision Strategic; Inability To Comment Directly, The Tone Of The Report Of The Three member Committee

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:एसटी विलीनीकरणाचा निर्णय धोरणात्मक; थेट अभिप्रायाबद्दल असमर्थता, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालातील सूर

नाशिक6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

एसटीचे शासनात विलीनीकरणाचा विषय समितीच्या कार्यकक्षेबाहेरील असून, तो धोरणात्मक स्वरूपाचा आहे. त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्यामुळे विलीनीकरणाच्या निर्णयाबाबत समितीच्या अहवालात असमर्थता असल्याचा सूर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी “दिव्य मराठी’ला दिली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे नजर लावून बसलेल्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा शुक्रवारपर्यंत वाढली आहे. शासनाच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंगळवारी न्या. दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आला. “मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेल्या अभिप्रायासह अहवाल सादर करा,’ असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने ११ फेब्रुवारीस दिल्यानंतरही राज्य शासनाने त्याशिवायच अहवाल सादर केल्याने परिवहन खात्याची उदासीनता दिसून आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र नसल्याने न्यायालयाने तो सरकारकडे परत पाठवला.

पुढील निर्णय समिती घेईल
हा अहवाल थेट न्यायालयात मांडण्यात आला होता. आता कोर्टाच्या आदेशानुसार तो आम्ही पुन्हा समितीकडे पाठवू. त्यामुळे आता तो अहवाल राज्य सरकार व प्रतिवादी यांना देण्याबाबतचा समिती पुढील कार्यवाही करेल. -अॅड. पिंकी भन्साळी, सरकारी वकील

अहवालातील प्रमुख मुद्दे

 • विलीनीकरण ही धोरणात्मक बाब, तातडीने निर्णय अशक्य.
 • हा विषय शासनाच्या त्रिसदस्यीय समितीच्या कार्यकक्षेबाहेर

यासाठी हे दिले दाखले

 • एसटी महामंडळाची कमकुवत आर्थिक स्थिती
 • कोरोनामुळे कोलमडलेली राज्याची अर्थव्यवस्था
 • राज्यातील अन्य महामंडळांतील कर्मचारी संख्या अन्य राज्यांच्या परिवहन सेवेतील पगार
 • राज्याने वाढवलेले वेतन, भत्ते यांची तुलनात्मक स्थिती

राज्य सरकार उघडे पडले
अहवाल वाचनासाठी द्या, अशी आम्ही मागणी केली. मात्र आम्हाला अहवाल शुक्रवारी देणार असल्याचे सरकार सांगत आहे. त्याच दिवशी सुनावणी आहे. आज सरकार न्यायालयात उघडे पडले. - अॅड. गुणरत्न सदावर्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील

बातम्या आणखी आहेत...