आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दंड माफी अभय योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क भरण्याचा पहिला टप्पा 31 जुलै 2022 पर्यंत संपणार आहे. असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार (दि.30) व रविवार 31 जुलै रोजी सुटीच्या दिवशी फक्त याच कामासाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी कळविले आहे.
दंड माफी अभय योजनेअंतर्गत नागरिकांनी 31 जुलै 2022 पर्यंत सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास साधारण 90 टक्के माफी शासनामार्फत देण्यात येणार आहे. तसेच 1 ऑगस्ट 2022 नंतर सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास 50 टक्के माफी देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ही दंडाची रक्कम 31 जुलै 2022 पर्यंत भरल्यास त्यांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. अन्यथा 1 ऑगस्टनंतर मिळणारा लाभ कमी होईल. म्हणजे तब्बल 40 टक्के जादा रक्कम भरावी लागले. यासाठी नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत 31 जुलैपुर्वीच लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे.
चलनेही करावी लागणार जमा
शनिवार 30 जुलै व रविवार 31 जुलै 2022 रोजी शासन जमा झालेली चलने त्याच दिवशी किंवा 1 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यानंतर ही चलणे स्विकारली जाणार नाही. त्यामुळे संबधितांनी ती नोंदणी केल्यानंतर तत्काळ जमा करावीत, असेही दवंगे यांनी स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.