आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार एअरची नाशिक - बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरू:3 फेब्रुवारीपासून होणार फेऱ्या; मनीष रावलांची माहिती

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून (3 फेब्रुवारी) 2023 पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली आहे.

योजनेला मुदतवाढ

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि नाशिकचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी नुकतीच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून 3 फेब्रुवारी 2023 पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी नाशिक - बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भुजबळांच्या प्रयत्नाकडे लक्ष

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातूनच राज्य सरकारने नाशिक विमानतळाची इमारत बांधली. एचएल चा रणवे आणि राज्य सरकारची ही इमारत यातून विमानसेवा नाशिककराना उपलब्ध करून देण्याची संकल्पना देखील त्यांचीच होती. 84 कोटी रुपये खर्चून ही इमारत बांधली गेली. त्यांच्या या दूरदृष्टीचे आजही नाशिककर तोंड भरून कौतुक करतात. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना देखील अचानक नियमित आणि उत्तम प्रतिसाद असतानाही विमानसेवा बंद झाल्याने नाशिककरांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. भुजबळ यांनी मात्र थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनाच या बंद झालेल्या सेवा पुरवत सुरू होण्याबाबत साकडे घातले आणि त्याला यशही मिळत आहे. स्टार एयरची सुरू होत असलेली ही सेवा हे त्याचेच उदाहरण मानले जात आ

असे असेल सेवेचे नवे वेळापत्रक

त्यानुसार एस 5,145 ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता निघेल नाशिक येथे 10.30 पोहचेल तर रविवारी सायंकाळी 5.50 वाजता सुटेल आणि सायंकाळी 6.05 वाजता नाशिकला पोहोचेल. तर एस 5,146 ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता निघेल 11.45 ला बेळगाव येथे पोहचेल. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता निघेल आणि सायंकाळी 7.30 वाजता बेळगावला पोहचेल. या मार्गावर 50 सीटर एम्ब्रेअर 145 विमाने धावणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...