आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धाेरणांतर्गत शहरात स्थापन केलेल्या २२५ फेरीवाला झाेनपैकी ज्या ठिकाणी काेणीही बसत नाही असे फेरीवाला झाेन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच नाशिक-मुंबई महामार्गालगत मुख्य रस्ता व समांतर रस्त्यामध्ये असलेला स्टेट बंॅक चाैकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चाैपाटी अखेर हटवली जाणार आहे. फेरीवाला झाेनच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मान्यता दिली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने संबंधित फेरीवाला झाेन रद्द करण्याची रीतसर मागणीच केली हाेती. दरम्यान, विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पाथर्डी फाट्यालगत हाॅटेल गेट वे लगत स्थलांतरण केले जाणार आहे.
दरम्यान, तिबेटीयन मार्कट येथील फेरीवाल्यांना दिलासा दिला असून पार्किंगचे आरक्षण स्थलांतरित करून त्यांना आहे ती जागा खाद्य पदार्थ विक्रीसाठी आरक्षित केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली. महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार वर्दळीच्या ठिकाणी, दाट वस्तीच्या लाेकवस्तीत, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हाॅकर्स झाेनमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार साधारण २०१३ मध्ये त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी प्रथम शहरातील फेरीवाल्यांची बायाेमेट्रिक नाेंदणी करण्यात आली. शहरात साडे दहा हजाराहून अधिक सिडकाेच्या स्टेट बंॅक चाैकातील या चाैपाटीचे गेट-वे हाॅटेलच्या चाैकात हाेणार स्थलांतर.
फेरीवाल्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. फेरीवाला झाेन तयार करून अनेक वर्षे झाल्यामुळे आता बदलत्या स्थितीमुळे नवीन फेरीवाला झाेन काेठे करण्याची गरज आहे, अस्तित्वातील फेरीवाला झाेनचा वापर हाेताे की नाही याची चाचपणी करण्याच्या सूचना विभागीय अधिकारी व मिळकत विभागाला दिल्या. शहरात सध्या २२५ फेरीवाला झाेन असून त्यापैकी ८३ फेरीवाला झाेनमध्ये काेणीही फिरकत नाही. १३२ झाेनमध्ये फेरीवाला कार्यरत असून ११ झाेन तयार करण्याचे काम सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.