आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • ​​​​​​​Nashik News I State Bank Chaipati Will Finally Be Removed I National Highway Authority Letter To Municipal Corporation I Tibetan Market

स्टेट बॅंक चाैपाटी अखेर हटणार:तिबेटीयन मार्कटमधील खाद्य विक्रेत्यांना दिलासा, 'गेट वे'च्या भिंतीलगत हाेणार विक्रेत्यांचे पुर्नवसन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धाेरणांतर्गत शहरात स्थापन केलेल्या २२५ फेरीवाला झाेनपैकी ज्या ठिकाणी काेणीही बसत नाही असे फेरीवाला झाेन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मुंबई-नाशिक महामार्गालगत मुख्य रस्ता व समांतर रस्त्यामध्ये असलेला स्टेट बॅंक चाैकातील खाद्य पदार्थ विक्रेत्यांची चाेैपाटी अखेर हटवली जाणार आहे.

फेरीवाला झाेनच्या बैठकीत संबधित प्रस्तावाला मान्यता दिली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने संबधित फेरीवाला झाेन रद्द करण्याची रितसर मागणीच केली हाेती. दरम्यान, विक्रेत्यांचे पुर्नवसन करण्यासाठी पाथर्डी फाट्यालगत हाॅटेल गेट वे लगत स्थलांतरण केले जाणार आहे. दरम्यान, तिबेटीयन मार्कट येथील फेरीवाल्यांना दिलासा दिला असून पार्कींगचे आरक्षण स्थलांतरीत करून त्यांना आहे ती जागा खाद्य पदार्थ विक्रीसाठी आरक्षित केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त करूणा डहाळे यांनी दिली.

महापालीका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार वर्दळीच्या ठिकाणी, दाट वस्तीच्या लाेकवस्तीत, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हाॅकर्स झाेनमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धाेरणानुसार साधारण २०१३ मध्ये त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी प्रथम शहरातील फेरीवाल्यांची बायाेमेट्रीक नाेंदणी करण्यात आली. शहरात साडे दहा हजाराहून अधिक फेरीवाल्यांची नाेंदणी करण्यात आली आहे.

फेरीवाला झाेन तयार करून अनेक वर्ष झाल्यामुळे आता बदलत्या स्थितीमुळे नवीन फेरीवाला झाेन काेठे करण्याची गरज आहे, अस्तित्वातील फेरीवाला झाेनचा वापर हाेताे की नाही याची चाचपणी करण्याच्या सुचना विभागीय अधिकारी व मिळकत विभागाला दिल्या. शहरात सध्या २२५ फेरीवाला झाेन असून त्यापैकी ८३ फेरीवाला झाेनमध्ये काेणीही फिरकत नाही. १३२ झाेनमध्ये फेरीवाला कार्यरत असून ११ झाेन तयार करण्याचे काम सुरू आहे. यापैकी कुलकर्णी गार्डन व महात्मानगर येथे पार्कींगच्या कारणास्तव झाेन रद्द करण्यात आले.

२०१३-१४ मध्ये काही ठिकाणी चुकीच्यापद्धतीने फेरीवाला झाेन वसले असल्यामुळे ते रद्द करून नवीन झाेनसाठी जागा निश्चित करण्याच्या सुचना दिल्या. जागा उपलब्ध करणे, सपाटीकरण करणे, विशिष्ठ रंग देवून फेरीवाला झाेन लक्षात येईल अशापद्धतीने माॅड्युल तयार करण्याच्या सुचना दिल्या.

९ काेटी अपेक्षित असताना वसुली ४० लाख

शहरात २३० हून अधिक फेरीवाला झाेन असून त्यात साडे दहा हजाराहून अधिक फेरीवाले नाेंदणीकृत आहे. अनाेंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या किमान तिप्पट ते चारपट आहे. या फेरीवाल्यांकडून ९ काेटी रूपये वार्षिक महसुल अपेक्षित आहे मात्र हीच वसुली जेमतेम ४० लाखाच्या घरात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे विभागीय स्तरावर नाेंदणीसाठी अडचणी येत आहे. दरम्यान, आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेरीवाला झाेनमधून बाजार फी शुल्क अल्प प्रमाणात वसुल हाेत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...