आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • State Championship Competition Nashik Team Announced For Maharashtra State Kumar Group Competition; Selected By The Basketball Association

राज्य अजिंक्यपद स्पर्धा:महाराष्ट्र राज्य कुमार गटाच्या स्पर्धेसाठी नाशिकचा संघ जाहीर; बास्केटबॉल असोसिएशनकडून निवड

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हयातील सांगोला येथे दिनांक 11 ते 15 सप्टेंबर, 2022 दरम्यान कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकच्या संघाची घोषणा करण्यात आली. नाशिक जिल्हा अमेच्युअर बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुलांच्या आणि मुलींच्या संघांची प्राथमिक निवड करण्यात आली.

यानंतर यशवंत व्यायाम शाळा येथे या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामधून अंतिम संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या मुलांच्या कर्णधारपदी आयुष लोखंडे तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी साक्षी जयशिघांनी यांची निवड झाली आहे.

नाशिक जिल्ह्याचा मुलांचा संघ आणि मुलींचा संघ या राज्य स्पर्धेत चांगली कामगरी करेल असा विश्वास प्रशिक्षक राजेश क्षत्रिय यांनी व्यक्त केला. या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष आनंद द्रविड, गणेश राऊत, विवेक गायकवाड, सरिता सोनवणे, अक्षद क्षत्रिय, आनंद खरे, अविनाश खैरनार आदिनी शुभेच्या दिल्या.

नाशिकचे संघ खालीपप्रमाणे :

मुले : आयुष लोखंडे (कर्णधार), सन्मान टिळे, यश क्षत्रिय, ऋग्वेद कुलकर्णी, हरमित सिंह रिपीथाल, वेध पारेख, अमित कोष्टी, अहमद बेग, चिन्मय नागपुरे, रोनित खटोड, अथर्व आचार्य.

मुली : साक्षी जयसिंघानी (कर्णधार), रितीशा सोमणी, श्रुती करवा, सनवी अमृतकर, श्रीयंठोमरे, समृद्धी मोरे, धनश्री पारख, हंसवी राजपूत, भूमी मूरतडक, साक्षी कोलटर, तीर्था नाऊकुडकर, मधुरा शिरसाठ.

मुख्य प्रशिक्षक – राजेश क्षत्रिय, गणेश कलंगूल, श्रीमती गायत्री ढाकणे भिंग.

बातम्या आणखी आहेत...