आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांच्यासारखी माणसे लाभली, त्यांनी महाराष्ट्राची बांधणी केली. ३८ वर्षे यशवंतरावांनी महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात कर्तृत्व व वक्तृत्वाने नावलौकिक मिळविला. त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच मोठी धरणे, औद्योगिक संस्था आणि शिक्षण संस्था उभ्या राहू शकल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर व मविप्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भावे यांचे ‘यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतरचा महाराष्ट्र'' विषयावर व्याख्यान पार पडले. भावे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यामुळेच देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे.
रोजगार हमी योजना, कसेल त्याची जमीन, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, डोक्यावर मैला वाहून नेण्यास बंदी, सहकाराची पायाभरणी, एमआयडीसी, खासगी वाहनांचे राष्ट्रीयीकरण करून राज्य परिवहन मंडळाची (एसटी) स्थापना या महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात राबविल्या आणि यशस्वी करून दाखविल्या. याच योजना केंद्र सरकारने नंतर जशाच्या तशा उचलल्या. हा दूरदृष्टीपणा यशवंतराव चव्हाण यांच्याकडे असल्यामुळेच महाराष्ट्राने आतापर्यंत प्रगती केली आहे. ग्रामीण भागातून मुख्यमंत्री व्हायला हवे, यासाठी त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा मजबूत केल्या. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सुधाकर नाईक, विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावर पाहू शकला. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण नाशिक सेंटरचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे,नानासाहेब बोरस्ते, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अॅड. संदीप गुळवे उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.