आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धा:नाशिकच्या संघाला कांस्य पदक; खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आट्या पाट्या महामंडळ व आट्या पाट्या असोसिएशन ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट याच्या सयुक्त विद्यामाणे दिनांक 10 व 11 डिसेंबर 2022 ता.शेगांव जिल्हा बुलढाणा येथे 29 वी मुले व 22 वी मुली सब ज्युनियर राज्यस्तरीय आट्या पाट्या अजिंक्यपद पार पडल्या. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मुले व मुली यादोन्ही संघाने सहभाग घेतला होता.

मुलींच्या संघाने उपांत्य पूर्व फेरीत सोलापूर संघाशी चुरशी ची लढत दिली परंतु त्यांना यश आले नाही.मुलांच्या संघाने अमरावती संघाला(12-9) ने हरवून तृतीय क्रमांक पटकावला संघ प्रशिक्षक म्हणून गणेश ढेमसे व योगेश शेरमाळे तर संघ मार्गदर्शक म्हणून सुरज गायधनी यांनी काम बघितले.

या स्पर्धेमध्ये सहभागी नाशिक जिल्हासंघतील खेळाडू कुमार शुभम तागड , कुमारी स्नेहा कासार, कुमारी समृद्धी खाडे यांचे निवड राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धा चंदिगड येथे दि 16 ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

सदर संघाला जिल्हा सचिव संजय पाटील सर, प्रद्युम्न जोशी, स्वप्नील कर्पे, सुरेखा पाटील, आनंद खताळ, सुचेता रामराजे, सुनील दवांगे, पवन खोडे, गौरव ढेमसे, रोहन अडांगले, अमित इंगळे, अभिजित देशमुख,टीम कोच गणेश ढेमसे, टीम मॅनेजर सुरज गायधनी यांनी शुभेच्छा दिल्या.

हे आहे नाशिकच्या संघाचे खेळाडू

  • अथर्व खालकर :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल
  • अंशुल पोरजे :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल
  • नचिकेत टीळे:- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल
  • अथर्व जाधव:- लेट जयकुमार टिब्रेवाला स्कूल
  • शुभम तागड :- देवळाली हायस्कूल
  • दर्शन डेमसे :- देवळाली हायस्कूल
  • वेद नासिककर :- लेट जयकुमार टिबरेवाला स्कूल
  • आयुष गायटे :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल
  • सूहान लामछाने :- लेट जयकुमार टीब्रेवाला स्कूल
  • प्रज्वल लोंढे :- पुरुषोत्तम इंग्लिश मिडीयम स्कूल
  • सहिल जाधव :- के के वाघ स्कूल
  • नयन शेलार:- के के वाघ स्कूल
बातम्या आणखी आहेत...