आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय आंतरजिल्हा ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा:साताऱ्याच्या संघाचा बृहन्मुंबईवर विजय; 750 हून अधिक खेळांडूनी नोंदवला सहभाग

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- येथील रचना ट्रस्ट अँड कल्चरल ऍकॅडमी येथे कालपासून 17 वर्षांखालील मुलामुलींच्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेस काल प्रारंभ झाला. नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन उत्साहात पार पडले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन् , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी व नामवंत प्रशिक्षक श्रीकांत वाड ,रचना ट्रस्टच्या स्पोर्ट्स अँड कल्चरल ऍकॅडमीचे चेअरमन व स्पर्धा सचिव अतुल संगमनेरकर ,नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे प्रेसिडेंट राधेश्याम मुंदडा यांची समयोचित भाषणे झाली. समारंभाचे सूत्रसंचालन अमृता फाटक यांनी केले.

या स्पर्धेसाठी आ. देवयानी सुहास फरांदे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 750 हून अधिक युवा बॅडमिंटनपटूंनी सहभाग नोंदविला आहे. आजही आंतरजिल्हा स्पर्धांच्या अखेरच्या व अंतिम फेरीचे सामने होतील तर दि 14 नोव्हेंबरपासून 4 दिवस वैयक्तिक अजिंक्यपदासाठी सामने खेळले जातील.हे सारे सामने रचना ट्रस्ट व केनजिंग्टन क्लब यांच्या अद्ययावत क्रीडासंकुलांमध्ये खेळले जात आहेत.

काल सकाळच्या सत्रात सातारा जिल्हा संघाने बृहन्मुंबई जिल्हा संघावर 3/2 असा खळबळजनक विजय नोंदविला. 2/2 अशा बरोबरी नंतर खेळल्या गेलेल्या चुरशीच्या सामन्यात साताऱ्याच्या तनिष्क केंजळे व गार्गी चव्हाणने बृहन्मुंबईच्या आदीयंत गुप्ता तरुणी सूरी जोडीला 22/20,21/15 असे हरवून स्पर्धेतील मोठा अपसेट नोंदविला.मात्र साताऱ्याचा हा आनंद अल्पजीवी ठरला कारण

साताऱ्याचा संघ लातूर संघाकडून पराभूत

आता उपांत्यपूर्व फेरीसाठी पुणे वि औरंगाबाद,नागपूर वि लातूर,सांगली वि ठाणे व पालघर वि नाशिक असे सामने होत आहेत. आज नाशिकने रायगड संघाला 3/2 असे पराभूत केले. या विजयात पार्थ देवरे व पार्थ लोहोकरे यांनी आपापले सामने जिंकून मोलाचा वाटा उचलला. पार्थ देवरेने आर्यन एपटे ला 12/21, 21/10,21/11 असे चुरशीच्या लढतीत पराभूत केले,पार्थ देवरे व पार्थ लोहोकरे यांनी डबल्स मध्ये सुजल कोठारी व विनय पाटील जोडीचा पराभव केला.पार्थ लोहोकरे व हेतल विश्वकर्मा जोडीने मिक्सड् डबल्स मध्ये जिंकून नाशिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बातम्या आणखी आहेत...