आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन:सुदृढ व निकोप शारीरिक, मानासिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा - डॉ. विश्वासराव मंडलिक

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या ताणतणावाच्या काळात सुदृढ, निर्मळ व निकोप आरोग्य ही दुर्मिळ गोष्ट झाली असून त्यासाठी योगा ही अत्यंत उपयुक्त ठरणारी पद्धती आहे, म्हणून घरोघरी योगा पोहोचविण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक माणसाला योगा शिकणे गरजेचे आहे. याकरिता योगशिक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन योग विद्या गुरूकुलाचे कुलगुरू व योगाचार्य डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी केले.

राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम, पंचवटी येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनाला आज, शनिवार, दि. 10 रोजी सकाळी 9.00 वाजता प्रारंभ झाला. याप्रसंगी उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंडलिक बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर महामंडलेश्वर श्री. शिवानंद महाराज, स्वामी माधवगिरी महाराज, संमेलनाचे अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा पाटील, योग शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, उपाध्यक्ष राहुल येवला, महासचिव अमित मिश्रा, यु.के. अहिरे, डॉ. प्रीती त्रिवेदी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मंडलिक म्हणाले की, योगा हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी योगा हा योग्य पद्धतीने शिकणे आवश्यक आहे, मात्र तो सध्याच्या काळात विविध पद्धतीने शिकविला जातो, परंतु वेगवेगळ्या ग्रंथात योगाचा उल्लेख आढळतो, परंतु योगशिक्षकांनी आणि साधकांनी योग्य पद्धत वापरली तर चांगला परिणाम दाखवते. योगामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आत्मिक पातळीवर विकास होतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील म्हणाले की, योगा ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. केवळ योगासने म्हणजे योग नव्हे, तर पतंजली योगमुनींनी प्राचीन काळात योगासनाची माहिती दिलेली आहे. योग हा श्वसनावर आधारित असून त्यात आहाराचा कमी वापर होतो आणि अन्य तर व्यायामांमध्ये हृदयाला गतीला मिळते, त्यामुळे योग आणि इतर व्यायामातील फरक समजून घेतला पाहिजे. योगशिक्षक संघटनेच्या माध्यमातून यापुढे अत्यंत चांगले कार्य होईल, असा विश्वास ही अशोक पाटील यांनी व्यक्त केला.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी आपल्या मनोगत योगाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. जाधव म्हणाले की, आजच्या काळात योग शिक्षकांचे कार्य मोलाचे ठरणारे आहे. मेडिकल कौन्सिलने देखील योगाला मान्यता दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...